पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा, कोणाला कोणता पुरस्कार जाहीर झाला जाणून घ्या..

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात पद्म आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात चौघांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण पुरस्काराने १७ जणांना, तर ११७ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला, समाजकार्य, जनसेवा, साहित्य, व्यवसाय, वैद्यकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रातातील मन्यवरांना सन्मानित केले जाते. (Announcement of Padma Vibhushan, Padma Bhushan and Padma Shri awards, read what was announced to whom)

महाराष्ट्रातून कला क्षेत्रातून प्रभा अत्रे (Prabha Atre) यांना पद्मविभूषण पुरस्काराच घोषणा करण्यात आली. सीरमचे सायरस पुनावाला (cyrus poonawalla) आणि नटराजन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांना पद्मभूषण पुरस्कारा (Padma Bhushan Award) जाहीर झाला आहे. देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Announcement of Padma Vibhushan, Padma Bhushan and Padma Shri awards, read what was announced to whom)

 

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनाही पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) जाहीर झाला आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Former Chief Minister of Bengal Buddhadeb Bhattacharya) यांनाही पद्मभूषण, कोरोनाची स्वदेशी लस विकसित करणाऱ्या हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या (Bharat Biotech Company) मालकांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella, CEO of Microsoft) यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. (Announcement of Padma Vibhushan, Padma Bhushan and Padma Shri awards, read what was announced to whom)

यंदा चार पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले असून त्यापैकी तीन व्यक्तींना हा सन्मान मरणोत्तर दिला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि कल्याण सिंह यांच्याशिवाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच प्रभा अत्रे यांना कलाक्षेत्रातील पद्मविभूषण पुरस्कारा जाहीर झाला आहे. (Announcement of Padma Vibhushan, Padma Bhushan and Padma Shri awards, read what was announced to whom)

Local ad 1