शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जळून जाल : उद्धव ठाकरे

shiv sena Political Crisis : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) याठिकाणी पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shiv Sena chief and Chief Minister Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जळून जाल असा इशारा दिला. (An important meeting of the Shiv Sena executive was held at Shiv Sena Bhavan)

 

 

 

कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही, असे स्पष्ट केले. (An important meeting of the Shiv Sena executive was held at Shiv Sena Bhavan)

 

 

दरम्यान या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही, असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत (National Executive)मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde group) आपल्या गटाचे नाव ’शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ (Shiv Sena-Balasaheb Thackeray) असे ठरवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा ठराव महत्वचा आहे.

 

 

राष्ट्रीय कार्यकारणी ठराव मंजूर? (National executive resolution approved?)

  • निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना, पहिला ठराव पारित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक (An important meeting of the Shiv Sena executive was held at Shiv Sena Bhavan)

 

  • शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे, असा ठराव ही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी मांडला.

 

  • शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. (An important meeting of the Shiv Sena executive was held at Shiv Sena Bhavan)
Local ad 1