(An application under MahaDBT, a number of schemes) महाडीबीटी अंतर्गत एक अर्ज, योजना अनेक

नांदेड : राज्याच्या कृषी विभागाकडटून मिळणाऱ्या योजनांसाठी एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. (An application under MahaDBT, a number of schemes)

महाडीबीटीअंतर्गत अर्ज स्वीकृती प्रक्रिया (सन २०२१- २२) सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी २०२०- २१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला, परंतु त्यांची कोणतीही योजनेसाठी निवड झाली नाही, ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबीमध्ये बदल करु शकतील. असे अर्ज २०२१- २२ करिता ग्राह्य धरले जाणार आहेत. विशेष म्हणजे याकरिता शेतकऱ्यांना पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. २०२१-२२ करिता वरील अर्जातील ज्या बाबीकरीता अर्ज केले आहेत, या बाबीचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करण्यात येणार आहे. या योजनेव्दारे एका अर्जाद्वारे सर्वच लाभ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. (An application under MahaDBT, a number of schemes)

फलोत्पादन योजना अंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिकापालन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड, डाळिंब लागवड, मोसंबी लागवड, पेरु लागवड, सिताफळ लागवड, तसेच इतर फळबाग लागवड योजना, शेततळ्यातील पन्नी, सामायिक शेततळे तसेच कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, चलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, वखर आदी उपकरणासाठी अर्ज करता येइल. (An application under MahaDBT, a number of schemes)

MahaDBT
MahaDBT

अर्जदारांना अनुदान वितरित करण्यासाठी यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. या कामासाठी लाभार्थ्यांनी जवळील सामुहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन रविशंकर चलवदे यांनी केले आहे. (An application under MahaDBT, a number of schemes)

Local ad 1