(Amrita Fadnavis) “माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !” ः अमृता फडणवीस

मुंबई :  मुंबई काँग्रसेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांची माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यावर टिका केली आहे. त्यात पोलिसांची बँक खाती कशी वळवली, यावर प्रश्न विचारला आहे. भाई जगताप यांची टिका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !”,  अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी आमदार भाई जगताप (bhai jagtap) यांना खडसावले आहे.  (Amrita Fadnavis  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बाॅम्ब नंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कमालीचे आक्रमक झाले आहेत.  (Amrita Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमकतेला मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उत्तर दिले. माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले,  फडणवीस सत्तेत असताना राज्यातील पोलिसांच्या वेतनाची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केल्या. तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली, त्याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे, असे आमदार जगताप म्हणाले. (Amrita Fadnavis)

भाई जगताप यांची ही टीका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत भाई जगताप यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’… अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना खडसावले आहे. (Amrita Fadnavis)

Local ad 1