पीक विम्याची रक्कम आज बँकेत होणार जमा
नांदेड : अनियमित पावसामुळे नांदेड जिल्हयातील खरीप हंगाम (Kharif season in Nanded district) पूर्णपणे वाया गेला आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा पंतप्रधान पीक विमा उतरवला आहे, (The Prime Minister took out crop insurance) त्यांना आज सोमवारपासून नुकसान भरपाईचा मोबदला बँक खात्यावर जमा होणार आहे. (The amount of crop insurance will be deposited in the bank today)
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 7 लाख 35 हजार 811 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा संरक्षण घेतले होते. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मंजूर 461 कोटींचा परतावा मंजूर झाला आहे. (The amount of crop insurance will be deposited in the bank today)
*शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा*
शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा
नांदेड जिल्ह्यात यंदा सुरुवातीला पावसाने उघडीप दिली. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. (Excessive rains have damaged kharif crops.) अंदाजे 50 टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाली आहे. तर काही महसूल मंडळात त्यापेक्षाही अधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. संपुर्ण नांदेड जिल्ह्यासाठी 461 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. (Crop insurance of Rs 461 crore sanctioned for Nanded district) त्यात हदगाव तालुक्याला सर्वाधीक 61 कोटी, लोहा 53 कोटी तर किनवटला पाच कोटी परतावा मंजूर झाला आहे. (The amount of crop insurance will be deposited in the bank today)
नुकसान झालेले क्षेत्र (प्राथमिक माहिती)
अतिवृष्टीमुळे जिल्हयात प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नांदेड 4407 हे.आर, अर्धापूर 8178 हे.आर., कंधार 45165 हे.आर, लोहा-51900 हे.आर. देगलूर-22788 हे.आर. मुखेड 65078 हे.आर., बिलोली 25890 हे.आर. नायगांव 39294 हे.आर. धर्माबाद-2577 हे.आर., उमरी-22064 हे. आर, भोकर 4894 हे. आर. मुदखेड 13539 हे.आर. हदगांव-250 हे. आर, हिमायतनगर-21768 हे.आर, किनवट 33785 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे मुकसान झाले आहे.