पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी संघटनांचे पुण्यात धरणे आंदोलन
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी औरंगाबाद पैठण (Aurangabad Paithan) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा ज्योतीराव फुले (Mahatma Jyotirao Phule) तसेच शिक्षण महर्षि कर्मवीर भाऊराव पाटील (Education Maharishi Karmaveer Bhaurao Patil) यांच्याबाबत अत्यंत अपमानकारक विधान जाहिर सभेत केलेले आहे. हे विधान भारतीय दंड संहितेच्या प्रचलित फौजदारी स्वरुपाच्या गुन्हयांसोबतच अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंधक करणाच्या कलम ३ (१) (एफ) नुसार गंभीर स्वरुपाच्या फौजदारी गुन्हयाच्या त्यामुळे त्यांचेवर सदर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना अटक कारावी, मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटना यांच्या वतीने लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आले.
माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला लांछन निर्माण करणारे व महाराष्ट्राची समुद परंपरा कलंकीत करणारे मंत्री आहेत. माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्यायचे प्रदेश अध्यक्ष जयदेव गायकवाड यांनी “राज्यातील थोर महापुरुषांच्या बदनामी बाबत सातत्याने वक्तव्य करणे हे भाजपचे षडयंत्र असून केवळ भाजपकडे कोणत्याही महापुरुष नसल्याचे शल्य ते याद्वारे व्यक्त करीत आहे. परंतु भाजपने राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणे हे चुकीचे आहे असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील आंदोलनात सहभाग घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केल्याबद्दल अॅक्ट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली. (Ambedkari organizations protest in Pune for the arrest of Guardian Minister Chandrakant Patil)
रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे म्हणाले, “चंद्रकांत पाटील” यांनी आंबेडकरी आस्मितेला हात घातला असून बाबासाहेब आंबेडकर व अन्य पुरुषांचे अवमान आंबेडकरी चळवळ कधीच सहन करणार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा राजीनाम्यापर्यंत व त्यांच्या अटकेपर्यंत आंबेडकरी चळवळीचे आंदोलन सातत्याने सुरूच राहील. गुरुवारी (दिनांक १५) पुणे शहरामध्ये तब्बल १०० महामानव गौरव सभांचे आयोजन करुन चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल आंदोलन केले जाणार असल्याचे डंबाळे यांनी सांगितले. (Ambedkari organizations protest in Pune for the arrest of Guardian Minister Chandrakant Patil)
आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मुनुवर कुरेशी, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेवक राहुल तुपेरे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, राहुल तायडे, अनलि जगताप, शैलेंद्र मोरे, लोकजनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट, अनिल हातागळे, राहुल ससाणे, विजय जगताप, दत्ता पोळ, अंजुम इनामदार, प्रेरणा गायकवाड, विजय जगताप, सोनिया ओव्हाळ, सुरेखा कांबळे, सागर कांबळे, किरण गायकवाड, रमेश ठोसर, संजय कांबळे, उज्वला सरोगोड, स्वातीताई गायकवाड, भिमराव कांबळे, रफिक मुल्ला, किरण सोनवणे, अरुन कदम, दिपक आव्हळे, आदी मान्यवर सहभागी झाले होते. (Ambedkari organizations protest in Pune for the arrest of Guardian Minister Chandrakant Patil)