(Allegations made by Parambir Singh are serious) परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर : खासदार संजय राऊत

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ‘अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,’ अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली आहे. (Allegations made by Parambir Singh are serious: MP Sanjay Raut)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Allegations made by Parambir Singh are serious: MP Sanjay Raut)

परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ठ  दिले होते. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे. (Allegations made by Parambir Singh are serious: MP Sanjay Raut)

Allegations made by Parambir Singh are serious
Parambir Singh

राज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झाले असून,  सरकारमधील घटकांनी आत्मपरिक्षण करावे. आपले पाय जमिनीवर आहेत की, नाही ते तपासून पाहावे, असा सल्ला संजय राऊत यांनी सरकारला दिला. (Allegations made by Parambir Singh are serious: MP Sanjay Raut)

या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले असून, यासंदर्भात मी अनेकदा ‘सामना’मधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे सूचक विधान राऊत यांनी केले. 

Local ad 1