अखेर आर्यनसह तिघांना जामीन, उद्या किंवा परवा येणार तुरुंगाबाहेर

Aryan Khan : मुंबई : ड्रग्ज प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या अभिनेता शहारुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अन्य दोघांनाही जामीन मिळाला आहे. आदेशाची प्रत उद्या मिळण्याची शक्यता असून, त्यानंतरच तुरुंगातून बाहेर येणार आहेत (All three, including Aryan Khan, granted bail)

 

 गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आर्यन खानसह अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.  निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती मुकूल रोहतगी यांनी दिली. (All three, including Aryan Khan, granted bail)

 

 

साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी माध्यमांनी गराडा घातला.  त्यावर वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नो कमेंट एवढंच म्हणून ते निघून गेले. (All three, including Aryan Khan, granted bail)

Local ad 1