...

(All religious places closed in Nanded district) नांदेड जिल्ह्यात सर्व धार्मिकस्थळे बंद

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी 625 कोरोना रुग्णांची भर पडली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन दररोज नवनविन आदेश जारी करत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्याची लाॅकडाऊनकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी जारी केलेल्या आदेशात सर्व धार्मिक स्थळे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत. (All religious places closed in Nanded district)

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज नव्याने वाढ होत आहे. गुरुवारी (दि.18) प्राप्त झालेल्या अहवालात 236 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. 625 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत तर उपचार सुरु असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दोन हजार 211 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक हजार 549 निगेटिव्ह आले तर 625 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 29 हजार 145 इतकी झाली आहे. (All religious places closed in Nanded district)

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. बुधवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी दोन हजार 211 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक हजार 549 निगेटिव्ह आले तर 625 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 29 हजार 145 इतकी झाली आहे. आतापर्यंत 24 हजार 565 रुग्ण घरी परतले आहेत. (All religious places closed in Nanded district)

All religious places closed in Nanded district

चौफाळा नांदेड महिला (वय 60), लेबर कॉलनी नांदेड पुरुष (वय 78), शिवाजी चौक हदगाव पुरुष (वय 85) यांच्यावर अनुक्रमे जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय व हदगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या एकुण रुग्णांची संख्या 627 इतकी झाली आहे. (All religious places closed in Nanded district)

गुरुवारी नांदेड महापालिका क्षेत्रात – 368, नांदेड ग्रामीण – 19, अर्धापूर – 13, मुदखेड – एक, लोहा- 43, देगलूर – आठ, मुखेड -36, किनवट- 19, हदगाव – 20, माहूर – सात, उमरी – 12, नायगाव – चार, कंधार – सात, भोकर – पाच, बिलोली – पाच, धर्माबाद – 50, परभणी – चार, हिंगोली – दोन, यवतमाळ – दोन असे 625 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तीन हजार 728 बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 51 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 325 स्वॅबची चाचणी सुरु होती. (All religious places closed in Nanded district)

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी जारी केलेल्या आदेशात सर्व मंदीर, मस्जीद, गुरुद्वार, गिरीजाघर, बौद्धविहार व इतर धार्मिक व प्रार्थना स्थळे 18 ते 31 मार्चपर्यंत बंद असणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. (All religious places closed in Nanded district)

Local ad 1