पुणे Weather update : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सोमवार आणि मंगळवारी राज्यातील परभणी, जालना, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे. तुम्हांला हा प्रश्न पडला असेल, ग्रीन अलर्ट (Green alert) ऑरेंज अलर्ट (Orange alert) येलो (Yellow alert) आणि रेड अलर्ट (Red alert) म्हणजे नेमकं काय? हो, त्याचीच उत्तरे तुम्हांला वाचायला मिळणार आहेत. (“Alert” was declared; What is it? Know..!)
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आणि परिस्थितीच्या तीव्रतेनुसार, ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले जातात. म्हणजेच नागरिकांना सतर्क केलं जातं. हे चार ही अलर्टची वर्गवारी करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.. (“Alert” was declared; What is it? Know..!)
रेड अलर्ट म्हणजे काय ?
रेड अलर्ट म्हणजे मोठी नैसर्गिक आपत्तीची शक्यता. रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या प्रदेशातील स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे असते संकट अधिक धोकादायक, तीव्र असल्यास, सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय ?
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि त्यासाठी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. यामध्ये वीजपुरवठा खंडीत होणे, वाहतूक ठप्प होणे, असे प्रकार होऊ शकतात.
यलो अलर्ट म्हणजे काय ?
हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत संकट ओढवण्याची शक्यता असल्यास यलो अलर्ट जारी केला जातो. या संकटामुळे दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरीचा इशारा दिला जातो म्हणजेच यलो अलर्ट जारी केला जातो.
ग्रीन अलर्ट म्हणजे काय ?
आपण सिग्नलवर रेड असेल तर थांबतो, त्याच प्रमाणे ग्रीन असेल तर आपला मार्ग मोकळा असतो.त्याच प्रमाणे हवामान स्वच्छ असणार आहे, पुढे कोणत्याही संकटाची चाहुल नाही. सारं काही सुरळीत आहे, हे दर्शवणारा ग्रीन अलर्ट असतो.