...

दारूड्या पतीचे मस्तकच फिरले बायकोला संपवत स्वता: केली आत्महत्या !

नायगाव : नायगाव तालुक्यातील नरंगल येथे दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन मयत वडीलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Alcoholic husband commits suicide by killing his wife! )


गुरुवारी रात्री शेतीच्या वादातून मुकींद भुजंग पट्टेकर आणि पत्नी रेणूकाबाई यांच्यात वाद झाला होता. पण हा वाद नेहमीचाच असल्याने रेणूकाबाई ही शुक्रवारी सकाळी शेतात असलेल्या जनावराचे दुध काढण्यासाठी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान शेताकडे गेली होती. पत्नी शेतात एकटीच गेली असल्याची संधी साधून मुकींद हा पत्नीच्या मागेच शेतात गेला आणि धारधार शस्त्राने पत्नीचा  खून केला. पत्नी जाग्यावरच मृत्यू झाल्यानंतर स्वतः ही दुसर्‍याच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामराव पडवळ हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. त्यांनतर शवविच्छेदनानंतर दोन्ही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Local ad 1