दोन वर्षानंतर यंदा पालखी पंढरपूरला पायी मार्गस्थ होणार ; प्रशासन लागले कामाला

पुणे : कोरोनानंतर प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Palkhi of Shri Sant Dnyaneshwar Maharaj) आळंदीतून, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी (Shri Sant Tukaram Maharaj Palkhi) देहूतून पंढरपूरपर्यंत पायी मार्गस्थ होणार आहे. त्याची जिल्हा प्रशासनाकडून पूर्व तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली आज देहू, आळंदी देवस्थानांचे विश्वस्त तसेच प्रशासनातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. (Alandi to pandharpur wari 2022)

 

आळंदी आणि देहू संस्थानांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालखीतळ, विसावा या ठिकाणची कामे १० जूनपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. (Alandi to pandharpur wari 2022)

करोना प्रादुर्भाव आटोक्यातआल्यानेपायीसोहळा निश्चित झाला असून, संत ज्ञानेश्वर महाराजांचीपायीपालखी२१ जून रोजी आळंदीतून, तर संत तुकाराम महाराज पायीपालखी२० जून रोजी देहूतूनपंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारआहे. (Alandi to pandharpur wari 2022)

 

गेली दोन वर्ष पालखी प्रस्थान सोहळा झाला नसल्याने यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप पालखीतळ, विसावा ठिकाणे आणि महामार्गावरील कामे पूर्ण झाली नसून अनेक समस्या कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. (Alandi to pandharpur wari 2022)
Local ad 1