अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे संत तुकाराम वैश्विक कथा स्पर्धेचे आयोजन

पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे ‘संत तुकाराम वैश्विक कथा लेखन स्पर्धा’ आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. या स्पर्धेत जगातील कोणीही स्पर्धक, लेखक सहभागी होऊ शकतात. (Akshardan Pratishthan organizes Sant Tukaram Global Story Competition)

 

 

या कथा स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, १००१, ७०१ रुपयांची रोख रक्कम व पुस्तके, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन, तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. (Akshardan Pratishthan organizes Sant Tukaram Global Story Competition)

“संत तुकाराम हे भाषा, प्रदेश यांच्या पुढे जाणारे वैश्विक दर्जाचे श्रेष्ठ विचारवंत, साहित्यिक होते. त्यांचा आदर्श कायम आपल्यासमोर रहावा, त्यांचे स्मरण व्हावे आणि दर्जेदार लेखनाला व नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ही कथा स्पर्धा आयोजित केली आहे. इच्छुकांनी akshardan2014@gmail.com / 9637993319 यावर कथा पाठवाव्यात” असे आवाहन अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांनी केले आहे.  (Akshardan Pratishthan organizes Sant Tukaram Global Story Competition)

 

Local ad 1