Akshardan Diwali 2023 : राजकारणात प्रवेश करण्यासाठी आयुष्यात पहिली निवडणूक प्रत्यक्ष लढविणे आवश्यक असते. प्रत्येकाला आयुष्यातील पहिली निवडणूक आयुष्यभर लक्षात असते. त्यामध्ये आलेले अनुभव येणाऱ्या निवडणुकीत त्याचा वापर केला जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गजांच्या पहिल्या निवडणुकीचा अनुभव वाचायचे असेल तर अक्षरदान दशकपूर्ती दिवाळी अंक (Akshardan Diwali Ank) घ्यायला विसरु नका. (Akshardan Diwali 2023 Akshardan Diwali ank 2023)
यंदा अक्षरदान दशकपूर्ती दिवाळी अंक ‘पहिली निवडणूक’ या विषयाला वाहिलेला आहे. या अंकात जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, नाना पाटील, प्र. के. अत्रे, जॉर्ज फर्नांडिस, शारदाबाई पवार, अण्णासाहेब शिंदे, कॉ. डांगे, दत्ता सामंत, इंदिरा मायदेव, गणपतराव देशमुख, बाळासाहेब देसाई, केशरकाकु क्षीरसागर पतंगराव कदम, विलासराव देशमुख, आर आर पाटील अशा २७ नेत्यांच्या पहिल्या निवडणुकीचे थरारक आणि दुर्मिळ अनुभव मांडले आहेत.
प्रसिद्ध जुन्या राजकीय कवितांनी अंक सजला आहे. नेत्यांची पहिली निवडणूक, आठवणीतील निवडणूक, राजकीय पक्षांची निवडणूक, चित्रपट, साहित्यातील अन् लढवायच्या राहून गेलेल्या निवडणुकांचा माहोल मधुकर भावे, विजय चोरमारे, समीर गायकवाड, दत्ता जाधव, उज्ज्वला बर्वे, राजू इनामदार, श्रीरंग गायकवाड, विवेक घोटाळे, उमाकांत जाधव, संपत मोरे, इंद्रजीत भालेराव, मनोज बोरगावकर अशा मान्यवर लेखक, पत्रकार, अभ्यासकांनी उभा केला आहे.
सरदार जाधव यांचे अफलातून मुखपृष्ठ, जितेंद्र साळुंखे, ज्योती डेरेकर, दिलीप दारव्हेकर यांची कलात्मक रेखाटने अंकाला उंचीवर नेतात. महाराष्ट्राचे राजकारण समजून घेण्यास हा अंक निश्चितच संदर्भग्रंथ ठरणार आहे. (Akshardan Diwali 2023 Akshardan Diwali ank 2023)
अंक मिळविण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
संपादक : मोतीराम पौळ पाने : २०६ किंमत : ३०० रुपयेसंपर्क : ९६३७९९३३१९