शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President MP Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation) देत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते, नेत्यांनी राजीनामा मागे घ्या अशी मागणी केली. त्यानंतर गेली तीन दिवस राज्यातील राजकारण तापलेले होते अखेर पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) उपस्थित नसल्याने प्रश्न उपस्थित केला जात होता. राजीनामा मागे घेतल्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रीया ट्विटरवर व्यक्त केली आहे. (Ajit Pawar’s first reaction after Sharad Pawar’s decision to withdraw his resignation)

 

 

 

 

राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (National President of Nationalist Congress Party) कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे, असे अजित पवार यांनी ट्विट केले आहे. (Ajit Pawar’s first reaction after Sharad Pawar’s decision to withdraw his resignation)

 

 

 शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत, असेही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar’s first reaction after Sharad Pawar’s decision to withdraw his resignation)
Local ad 1