बारामतीकरांना अजित पवारांची भावनिक साद, म्हणाले आता मांझ ऐका !
बारामती । लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही साहेबांचा मान राखून सुप्रियाला साथ दिली, आता यावेळी मात्र माझं ऐका, बारामती महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नंबर एकची करून दाखवतो, असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीतील अनेकांनी मला भेटून लोकसभेला साहेबांसाठी मतदान केलं, मात्र विधानसभेसाठी आम्ही तुम्हालाच साथ देणार, असा शब्द दिला असल्याचे सांगून लोकसभेवेळी जे बरोबर नव्हते, त्यांचा राग मनात धरू नका असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. (Ajit Pawar filed nomination form in Baramati)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed