राज्यात राजकीय भूकंप : अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. (Ajit Pawar participated in Shinde-Fadnavis government)

 

Ajit Pawar participated in Shinde-Fadnavis government

पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतर म्हणजे 1994 सालानंतर एका नेत्याच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आले आहे.
  • पंतप्रधान मोदी साहेबांचे नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदी साहेबांचे मोठा काम.
  • देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
  • आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय.
  • अनेक दिवस चर्चा सुरु होती. देशपातळीवरील आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करुन विकासासाठी आम्ही सरकार मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला.
  • मोदीसाहेब देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत.
  • देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान मोदी साहेब करत आहेत, म्हणूनचं त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय.
    विकासाला महत्व देण्यासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय.
  • शुक्रवारी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला.
  • इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. तरुणांना संधी देणार. त्यामुळे आदिती तटकरे, संजय बनसोडे या तरुणांना संधी.
  • महिला, आदिवासी, ओबीसींना मोठ्या प्रमाणात सत्तेत संधी.
  • आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना असून सुध्दा विकासाकामे केली.
  • आपण विकासाला महत्व देऊनच काम करतो, टीका टिपणीला महत्व देत नाही.
  • पक्षातल्या बहुतेकांना आमचा निर्णय मान्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार बरोबर.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आणि पक्षाच्या चिन्हावर या पुढच्या निवडणुका लढविणार.  घड्याळ या चिन्हावर पुढच्या निवडणुका लढविणार.
  • आम्ही शिवेसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप बरोबर सुध्दा जाऊ शकतो. नागालँण्डमध्ये पक्ष यापूर्वीच भाजप बरोबर आहे.
  • पक्ष वाढी सुद्धा आम्ही सर्वस्व पणाला लावणार.
  • काही आमदार बाहेर आहेत, संध्याकाळपर्यंत ते मुंबईत पोहोचतील.
  • पक्षाचे आमदारांसह कार्यकर्ते सुध्दा आमच्यासोबत आहेत.
  • लोकशाहीत बहुमताला महत्व, त्यामुळे बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्ष आमच्या सोबत आहे, नेते आमच्या सोबत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेतला आहे.
  • महाराष्ट्रातल्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत.
  • राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले त्यामुळे सहकारी पक्षांना सोबत घेऊनच राज्यातील सत्ता चालवावी लागले.
Local ad 1