(co-morbid) सहव्याधी असलेल्या 25 वर्षावरील व्यक्तींना कोोरोना लस द्या ः अजित पवार

पुणे ः केंद्र शासनाने 45 वर्षावरील सहव्याधी (co-morbid)  आहेत. कोरोना प्रतिबंधक  लस  दिली जाणार आहे. तसेच 25 वर्षावरील ज्यांना सहव्याधी (co-morbid) आहेत, अशा नागरिकांनाही कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लवकरच राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Ajit Pawar)

कोरोना लस कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकार असून,  1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तरी 45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे. (co-morbid)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना 25 वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध देण्याची विनंती करणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी बारामती येथे बोलत होते. (co-morbid)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी इच्छा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली होती. (co-morbid)

Ajit Pawar Co Morbid Corona Vaccination
Local ad 1