...

अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचा ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य करार

 पुणे : भू-राजकीय संकटाचा सामना करण्यासाठी सहयोग, समन्वय आणि विचारांची देवाणघेवाण करणे ही काळाची गरज आहे. सतत वाढत असलेल्या, नवनवीन भू-राजकीय संकटांशी झुंजत असलेल्या जगात, विचार, संशोधन आणि धोरणांची देवाणघेवाण वाढवणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जागतिक सहकार्याची गरज ओळखून, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने (Ajeenkya D.Y. Patil University)  (एडीवायपीयू) वॉशिंग्टन डीसी येथील ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट (जीपीआय) सोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ ही वॉशिंग्टन डीसी येथील प्रतिष्ठित ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटशी संलग्न असलेली भारतातील एकमेव संस्था आहे. (Ajeenkya DY Patil University signs MoU with Global Policy Institute) 

 

 

सावधान..! म्हडाचे घर देण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

 
१३ जानेवारी २०२५ रोजी एडीवायपीयू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “स्ट्रॅटेजिक जिओपॉलिटिक्स अँड सिक्युरिटी इश्यूज” या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या परिसंवादामध्ये विचारवंत, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते आणि विद्यार्थी एकत्र आले होते. इंडो-पॅसिफिक क्षेत्राची प्रादेशिक सुरक्षा आणि जागतिक धोरण घडवण्यात शैक्षणिक संस्थांची भूमिका यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील यांनी केले. यावेळी ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर आणि अध्यक्ष आणि राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक पाओलो वॉन शिराच,जागतिक धोरणात्मक तज्ञ डॉ.निशकांत ओझा,अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन उपस्थित होते. 

 

उपस्थित मान्यवरांनी जागतिक संवाद आणि धोरणात्मक अभ्यासात नवोन्मेषाला प्रोत्साहन,इंडो-पॅसिफिकमधील धोरणात्मक भू-राजकारण: आव्हाने आणि संधी”सेमिनारमधील,अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ-ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट यांच्या भागीदारीचे महत्त्व अशा विविध  महत्त्वाचे मुद्द्यांवर प्रकाश टाकला. 

 

 

प्रादेशिक सुरक्षा, धोरणात्मक पातळीवर धोरण तयार करणे आणि जागतिक स्तरावर उद्भवणारी इतर नवनवीन आव्हाने यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगत संशोधन विकसित करण्यासाठी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ आणि ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
 डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील म्हणाले, “ही भागीदारी सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या भू-राजकीय आणि सुरक्षा मुद्द्यांवर संशोधन आणि चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावर अग्रणी बनण्याप्रती एडीवायपीयूची वचनबद्धता दर्शवते. जीपीआयसोबत आम्ही नेत्यांना आणि उद्याची धोरणे घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
 
वॉशिंग्टनमधील बे अटलांटिक विद्यापीठात ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर आणि अध्यक्ष आणि राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक पाओलो वॉन शिराच म्हणाले, “ही भागीदारी जीपीआयच्या समजुती आणि धोरणात्मक धोरण विकासाला चालना देण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. जागतिक भूराजकारणातील गंभीर आव्हाने आणि संधींना तोंड देण्यासाठी आम्ही एडीवायपीयूसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत.”

 

 

अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ-ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट भागीदारी इंडो-पॅसिफिक सुरक्षेपासून ते जागतिक धोरणात्मक प्रशासनापर्यंत विविध मुद्द्यांवर संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक देवाणघेवाण आणि धोरणात्मक चौकट विकासाला चालना देईल.
 
Local ad 1