वाढलेल्या विमान भाड्यांवर नियंत्रण आणावे – युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे
मुंबई : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे (Prathamesh should be made the state general secretary of Maharashtra Youth Congress.) यांनी केंद्रीय सहकार आणि नागरिक उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Union Minister of State for Cooperation and Civil Aviation Muralidhar Mohol) यांना पत्र लिहून हवाई भाड्यातील वाढ, विमानतळावरील महागडे अन्नपदार्थ आणि खाजगी विमान कंपन्यांच्या विमानतळ स्लॉटच्या गैरवापराची सखोल तपासणी करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. सण, उत्सव आणि उन्हाळी सुटीच्या काळात हवाई प्रवासाचे तिकीट २ ते ४ पट वाढते, यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. ही दरवाढ नियंत्रित करण्यासाठी सरकारने तपासणी करून हवाई भाड्यांवर मर्यादा घालावी आणि मनमानी दरवाढ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Airfares should be controlled – Prathamesh Abnave)
कॅन्टीन दरांची तपासणी करून स्वस्त दर लागू करावेत
विमानतळावर चहा-कॉफी यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी प्रवाशांना २०० रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते, जी सामान्य नागरिकांसाठी अयोग्य आहे. या अवास्तव दरांची सखोल चौकशी करून, विमानतळांवर परवडणारी कॅन्टीन सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्लॉट तपासणी करा
अनेक विमान कंपन्या महत्वाचे विमानतळ स्लॉट बुक करून ते योग्यप्रकारे वापरत नाहीत, परिणामी बळजबरीने सीट कमी दाखवून भाडे वाढवले जाते. यासाठी सरकारने तपासणी करून, स्लॉट गैरवापर करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, असे अबनवे यांनी सांगितले.
पुण्यातील राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान जीबीएसचे बाधित क्षेत्र घोषित !
प्रथमेयश अबनवे यांनी सरकारला वाढत्या हवाई भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, विमानतळांवरील महागाई रोखण्यासाठी आणि स्लॉट गैरवापरास आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. योग्य पावले उचलल्यास सामान्य प्रवाशांचा आर्थिक बोजा कमी होईल आणि हवाई प्रवास अधिक न्याय्य व परवडणारा होईल.