नांदेड : बाजारात बोगस कंपन्या, परवाना नसलेली अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे (HTBT Cottonseed) छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर-आरबीटी व बीटीबीजी-3 (BT, R-RBT, BTBG-3) या नावाने संबोधतात. या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करु नये व त्या बियाणांची शेतात लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे (District Superintendent Agriculture Officer Ravi Shankar Chalwade) यांनी केले आहे. (Agriculture department’s important appeal to farmers, what care should be taken while buying cotton seeds)
लोकसहभागातून मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य : डॉ. राजेंद्रसिंह राणा