राज्यात पुन्हा यलो, ऑरेंज अलर्ट जारी, केणत्या जिल्ह्यांचा समावेश ते जाणून घ्या..

पुणे : राज्यातील अनेक शहर आणि जिल्ह्यांचा तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर गेला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Again yellow, orange alert issued in the state)

 राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील पुढील तीन- चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २५ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Again yellow, orange alert issued in the state)

 

 

राज्यात २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. कोकण अन् गोव्यात हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर २६ ते २८ दरम्यान काही ठिकाणी जोरदार विजांचा कडकडाट मेघगर्जना व गारपीट होण्याची शक्यताही वर्तविली असून जोराचे वादळ देखील येवू शकते. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ आणि २८ रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट आहे. पुणे शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  (Again yellow, orange alert issued in the state)
Local ad 1