...

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचा दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

पुणे : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-diesel rates) कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. (After the Center, the state government’s relief, cut the price of petrol-diesel)

केंद्राने इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. आज पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. (After the Center, the state government’s relief, cut the price of petrol-diesel)
Local ad 1