मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी मुदतवाढ

नांदेड  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या सलग शेतजमिनीवर, बांधावर तसेच पडीक शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्ष लागवडीचा कालावधी 1 जुन ते 30 नोव्हेंबरपर्यंत ठरवून देण्यात आला होता. सन 2021-22 मध्ये फळबाग लागवडीसाठी असलेले अनुकूल वातावरण विचारात घेता फळबाग लागवडीसाठी हा कालावधी 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आला आहे. (Take advantage of the orchard scheme under Magrarohyo …)

 

 

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रोपवाटीकेवर आंबा, चिकु, पेरू, सीताफळ, मोसंबी, का. लिंबु. इत्यादी फळपिकांचे एकुण 3 लाख 46 हजार 342 कलमे-रोपे उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. (Take advantage of the orchard scheme under Magrarohyo …)

Local ad 1