...

आयटीआयच्या 4 हजार जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू ( Admission process)

नांदेड : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सन 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय आयटीआयत 2 हजार 616 तर खाजगी आयटीआयत 1 हजार 540 जागा अशा एकूण 4 हजार 156 जागेसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती  संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी दिली. (Admission process for 4,156 seats in ITI started)

आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक असून, जिल्ह्यातील प्रवेशासाठी विविध तालुकास्तरावर असलेल्या संस्थेत विविध ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येतो. (Admission process for 4,156 seats in ITI started)

जिल्ह्यातील आयटीआमधील ट्रेडमध्ये बेसिक कॉस्मेटोलॉजी, सुतारकाम, स्युईंग टेक्नोलॉजी, ड्राफ्टसमन सिव्हील, ड्राफ्टसमन मेकॅनिक, फिटर, फॉन्ड्रीमैन, आयसीटीएसएम, मशीनीस्ट, मशीनीस्ट ग्राईंडर, मेसन मेकॅनिक मोटार व्हीकल, फॅशन टेक्नोलॉजी, मेकॅनिक ट्रॅक्टर, पेंटर जनरल, शीट मेटल वर्कर, टुल अँड डायमेकर, टर्नर, वेल्डर, तारतंत्री, यांत्रिकी डिझेल, आरेखक यांत्रिकी इत्यादीचा समावेश आहे.

कुठे किती जागा..जिल्ह्यात शासकीय आयटीआय संस्थेची प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 820, धर्माबाद- 232, किनवट- 128, हदगाव- 228, भोकर- 84, देगलूर- 164, कंधार- 92, लोहा- 104, उमरी- 188, मुखेड- 84, बिलोली- 88, माहूर- 104, अर्धापूर- 64, नायगाव- 40, मुदखेड- 152, हिमायतनगर- 24, पाटोदा- 20 असे एकूण 2 हजार 616 जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यातील खाजगी आयटीआयत हुजूर साहेब नांदेड- 240, नॅशनल नांदेड- 124, ग्रामीण नेहरुनगर नागलगाव कंधार- 456, माळाकोळी लोहा- 272, विष्णुपुरी नांदेड- 252, कलावतीबाई चव्हाण नायगाव- 88, ग्रामीण कंधार- 108 अशा एकुण 1 हजार 540 जागा उपलब्ध आहेत.

Local ad 1