आयटीआयच्या 4 हजार जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू ( Admission process)
आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक असून, जिल्ह्यातील प्रवेशासाठी विविध तालुकास्तरावर असलेल्या संस्थेत विविध ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येतो. (Admission process for 4,156 seats in ITI started)
कुठे किती जागा..जिल्ह्यात शासकीय आयटीआय संस्थेची प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 820, धर्माबाद- 232, किनवट- 128, हदगाव- 228, भोकर- 84, देगलूर- 164, कंधार- 92, लोहा- 104, उमरी- 188, मुखेड- 84, बिलोली- 88, माहूर- 104, अर्धापूर- 64, नायगाव- 40, मुदखेड- 152, हिमायतनगर- 24, पाटोदा- 20 असे एकूण 2 हजार 616 जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यातील खाजगी आयटीआयत हुजूर साहेब नांदेड- 240, नॅशनल नांदेड- 124, ग्रामीण नेहरुनगर नागलगाव कंधार- 456, माळाकोळी लोहा- 272, विष्णुपुरी नांदेड- 252, कलावतीबाई चव्हाण नायगाव- 88, ग्रामीण कंधार- 108 अशा एकुण 1 हजार 540 जागा उपलब्ध आहेत.