...

अकरावी प्रवेश सीईटीसाठी “या” तारखेपर्यत करता येणार अर्ज (Admission)

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यात एक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे. ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://http cet mh ssc ac in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपर्यत उपलब्ध आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. (Eleventh admission can be applied for CET till 26th July)

 

इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन शनिवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इयत्ता 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची आहे. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची व ओएमआर आधारीत असेल. अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही डाॅ. भोसले यांनी सांगितले. (Eleventh admission can be applied for CET till 26th July)

Local ad 1