मोठी बातमी : मिनी मंत्रालयांवर येणार प्रशासक, तुमच्या जिल्ह्यात कोण असेल जाणून घ्या…

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (Zilla Parishad and Panchayat Samiti) निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. तर दुसरकीडे पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अनुक्रमे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदतेचा 13 आणि 20 मार्च रोजी कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे 14 आणि 21 मार्चपासून प्रशासक राज येणार आहे, यासंदर्भात ग्रामविकास विभागाने आदेश जारी केला आहे. (Who will be the administrator on Zilla Parishad, Panchayat Samiti in the state)

 

दहा नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

 

कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे ज्या इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. त्यांच्या इच्छेवर विरजन पडले आहे.  (Who will be the administrator on Zilla Parishad, Panchayat Samiti in the state)

 

नांदेडच्या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला राज्य शासनाची भरघोस मदत

 

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ नुसार राज्यातील २५ जिल्हा परिषद आणि २८३ पंचायत समित्यांचा कार्यकाल दि. १३ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. तर अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती धारणीचा कार्यकाल दि. २४ जून २०१२ रोजी संपुष्टात आहे. या सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती, उप सभापती आणि सदस्यांचे पदे एकाच वेळी रिक्त होत आहेत. (Who will be the administrator on Zilla Parishad, Panchayat Samiti in the state)

 

 

 

राज्यातील या आहेत जिल्हा परिषद
रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, परभणी,  नांदेड, उस्मानाबाद,  लातूर,  अमरावती,  बुलढाणा, यवतमाळ,  वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांवर प्रशासक येणार आहे. (Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Nashik, Jalgaon, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur, Kolhapur, Aurangabad, Beed, Jalna, Hingoli, Parbhani, Nanded, Osmanabad, Latur, Amravati, Buldhana, Yavatmal, Wardha, Chandrapur, Gadchiroli)

 

राज्य निवडणूक आयोगाने ०४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित कालमर्यादेत घेणे शक्य नाही आणि राज्य शासनाला विनंती केली आहे की, या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करावी, असे सूचविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer of Zilla Parishad) यांना जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी आणि २८३ पंचायत समित्यांचे संबंधित गट विकास अधिकारी (Group Development Officer) यांना पंचायत समित्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी अनुक्रमे दि. २० मार्च, २०२२ व १३ मार्च २०२२ आणि पंचायत समिती धारणीकरिता दि. २४ जून २०२२ नंतर पासून पुढील ४ महिन्यापर्यंत किंवा जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापतो तसेच पंचायत समित्याचे सभापती, उप सभापती व सरपंच समितीचे सभापती यांची पदे निवडणुकीद्वारे भरले जातील यापकी जे अगोदर घडेल तोपर्यंत प्राधिकृत करण्यात आले आहे.
Local ad 1