कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर’ (action mode)

नांदेड : कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका कायम असून, अजूनही दुसरी लाट पुर्णपणे ओसरलेली नाही. सुपर स्प्रेडर ठरणार्‍या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, (Important decision to test the corona of every person in the service sector including various government offices who are super spreaders) अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. (District administration on action mode to deport Corona)

 

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी डॉ. इटनकर बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (District administration on action mode to deport Corona)

यांची होणार कोरोना चाचणी
शासकीय कार्यालयाचा आणि सेवावर्गात मोडणार्‍या ज्या व्यावसायिकांचा अधिकाधिक विविध लोकांशी दररोज संपर्क येतो अशा व्यक्तींची सोळा वर्गवारीत विभागणी केली आहे. यात पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यत, ग्रामीण आरोग्य उपकेंद्र – अंगणवाडी पासून ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यत गट केलेले आहेत. याचबरोबर बँका, कृषी विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, विजवितरण, बस वाहतूक-डेपो पासून दुध विक्रेते, फळवाले, फेरीवाले, पेपर विक्रेते, रिक्षाचालक, खाजगी वाहनचालक आदी सेवा क्षेत्राचा समावेश सुपर स्प्रेडर मध्ये केला आहे. सर्वाधिक काळजी याच घटकापासून घेणे अत्यावश्यक असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

दररोज होणार आठ हजार चाचण्या
मोहिम 27 जुलैपासून सुरु होत असून ती 11 ऑगस्टपर्यत चालणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. दररोज किमान 5 हजार 700 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. प्रत्येक विभागाला नेमून दिलेल्या तारखेप्रमाणे पथकामार्फत कोविड-19 ची तपासणी केली जाईल. यात आरटीपीसीआरचे प्रमाण जास्तीत जास्त राहणार आहे. नांदेड मनपा क्षेत्रासाठी दररोज 2 हजार 310 चाचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. (District administration on action mode to deport Corona)

Local ad 1