(Administration for farmers woke up) शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने सुरु केले तक्रार निवारण कक्ष
नांदेड : खरपी हंगामात शेकऱ्यांना अनेक ठिकाणी बियाणे, रासायनिक खते चढ्या दराने खरेदी करावे लागले. तर दुसरीकडे प्रशासन केवळ आदेश जारी करण्यात व्यस्त होते. आतापर्यंत सुमारे 95 टक्के शेतकऱ्यांची बियाणे, रासायनिक खते खरेदी झाली. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केले असून, त्याठिकाणी शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Administration for farmers woke up, started grievance redressal cell)
खरीप हगंमाची पेरणीपूर्व मशागत हे मे महिन्यात केली जाते. तर त्यासाठी आवश्यक असलेले बियाणे, रासायनिक खते मे च्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी खरेदी करत असतात. एकाचवेळी शेतकरी खरेदीसाठी येत असल्याने अनेक कृषी केंद्र चालकांनी या संधीचा फायदा घेत, बियाणे, रासायनिक खतांची कृत्रिम टंचई निर्माण करत चढ्या दराने शेतकऱ्यांना खरेदी करायला भाग पाडले. आजही सोयाबिनचे बियाने हे 600 ते 700 रुपये मुळ किमतीपेक्षा अधिकने किमंतीने ग्रामीण भागात विक्री सुरु आहे. मात्र, त्याची पावती ही मुळ किमंतीचीच दिली जात असल्याची माहिती न नाव छापच्या अटीवर एका शेतकऱ्याने दिली. (Administration for farmers woke up, started grievance redressal cell)
जिल्ह्यातील मुख्य बियाणे वितरक व कंपनी प्रतिनिधी यांच्यासमवेत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (कधी?) झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बियाणे पुरवठा प्रती बॅग किंमतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना बियाणे दराबाबत अडचण येणार नाही व जादा दराने विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्ह्यातील मुख्य कृषि सेवा केंद्रधारक, कंपनी प्रतिनिधी तसेच प्रभारी मोहिम अधिकारी यांची उपस्थिती होती. (Administration for farmers woke up, started grievance redressal cell)