यश मिळवाचे असेल तर अभ्यास करावाच लागेल : डॉ. संभाजी पानपट्टे

कंधार kandhar news : गेली दोन वर्षे आपण कोरोना महामारीतून (corona pandemic) जात आहोत. या काळात शाळा, महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे अभ्यास बंद नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यासाविना कोणाला ही यश मिळत नाही, त्यामुळे पालकांनी मुलांकडून अभ्यास करून घ्यावा, असा सल्ला मीरा भाईंदर महापालिकेचे नवनियुक्त अतिरीक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी केले. (Additional Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation Dr. Sambhaji Panpatte)  

 

कंधार तालुक्यातील काटकळंबा (katkalamba tq kandhar) येथील डॉ. संभाजी श्रीहरी पानपट्टे यांना मीरा भाईंदर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे. यानिमित्त डॉ.पानपट्टे यांचा सपत्नीक मुस्लिम समाज बांधवांकडून (Brothers of the Muslim community) विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. (Additional Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation Dr. Sambhaji Panpatte)

 

यावेळी आमीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य वजीर पठाण, शाबुखा पठाण, नवाज सय्यद, सय्यद युसूफ, समदसाब सय्यद, महेबुब पठाण, सलीम पठाण, ईनुस शेख, आलतमस पठाण, बाबु सय्यद, काशीम सय्यद यांच्यासह मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.

कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला असून, शिक्षण क्षेत्रात याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. मात्र, पालक सजल राहिल्यास तो परिणाम जाणवणार नाही. कोरोनाचे सावट असल्याने प्रत्यक्ष शाळा भारत नाहीत. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या मात्र, पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन असे वर्ग घेतले जात आहेत. त्यामुळे ऑनलाइन तासांमध्ये मुलाने काय शिकलं याकडे पालकांचं लक्ष असणं आवश्यक आहे. सरकारी असो किंवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यात टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपला मुलगा अभ्यास करतोय की, नाही याकडे लक्ष असणे आवश्यक असल्याचे मत, डॉ. पानपट्टे यांनी व्यक्त केले. (Additional Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation Dr. Sambhaji Panpatte)

 

Local ad 1