(Addition of 927 corona victims in Nanded district on Sunday) नांदेड जिल्ह्यात रविवारी 927 कोरोना बाधितांची भर

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 673 अहवालापैकी 927 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 401 तर अँटिजेन तपासणीद्वारे 526 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 31 हजार 716 एवढी झाली आहे. (Addition of 927 corona victims in Nanded district on Sunday)

शुक्रवारी (19 मार्च) भक्तपूर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर शनिवार 20 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा, सरपंचनगर नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा, नसीर रोड नांदेड येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा, भूविकास कॉलनी नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा, रामनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे तर लोहा तालुक्यातील कलंबर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात व रविवार 21 मार्च रोजी होळी सराफा नांदेड येथील 73 वर्षाच्या एका महिलेचा, दीपनगर नांदेड येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 648 एवढी झाली आहे. (Addition of 927 corona victims in Nanded district on Sunday)

प्राप्त झालेल्या 4 हजार 673 अहवालापैकी 3 हजार 616 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 31 हजार 716 एवढी झाली असून यातील 25 हजार 463 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 5 हजार 377 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. (Addition of 927 corona victims in Nanded district on Sunday)

बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 220, किनवट कोविड रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 4, जिल्हा रुग्णालय नांदेड 22, देगलूर कोविड रुग्णालय 3, भोकर तालुक्यांतर्गत 2, मुदखेड तालुक्यांतर्गत 3, खासगी रुग्णालय 40 असे एकूण 309 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.28 टक्के आहे. (Addition of 927 corona victims in Nanded district on Sunday)

Local ad 1