...

उद्धव ठाकरे यांची भाजप-शिंदेवर जोरदार टिका

नागपूर : महाविकास आघाडीची आजची दुसरी सभा असून, महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर मध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन दाखवलं होते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ते देण्यात आला? सच्चा समाजसेवक समोर झुकावे लागते. आप्पासाहेब यांचे घराणे मोठे आहे. या घराण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे घराणे व्यसनमुक्तीचे काम करतात. दारूचे व्यसन घर उद्ध्वस्त करते पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. (Addiction to alcohol destroys the home, but intoxication of power destroys the country: Uddhav Thackeray)

 

भाषणातील महत्वाची मुद्दे…

एवढी लोकं जमली आहेत. पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. जगाच्या श्रीमंतीत अव्वल, यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालला आहे, पण गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे. ही तूच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले आहे. हा डेकोरेशन चा भाग नाही. भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरु आहे. एका माणसाने देशाला घटना दिला. मग एवढी मोठी जनता संविधान वाचवू शकत नाही. मी घटना बचाव करणार असं म्हणार नाही तर घटनेचे संरक्षण मीच करणार असे म्हणेन.

  • मी हल्ली शब्द जपून वापरायला लागलो आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी फडतूस शब्द बाहेर आला होता. पण फडतूस बोलण्यामागील माझा उद्देश काय होता? मविआच्या सरकारवेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय. (Addiction to alcohol destroys the home, but intoxication of power destroys the country: Uddhav Thackeray)
  • आजच्या सभेचे वेगळेपण सांगतो. पहिले युती होते, पण आम्हाला फसवलं, त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो. आमच्या सरकारने काम केलं मग जनतेसमोर आलोय. सरकार गद्दारी करुन पाडलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू आणि करु तर छातीवर करु. हे अवकाळी सरकार आलं आहे. (Addiction to alcohol destroys the home, but intoxication of power destroys the country: Uddhav Thackeray)

अयोध्येला मी, संजय राऊत सुद्धा गेलो होतो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तो मुद्दा कोर्टात प्रलंबित होता. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही म्हणालो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचं सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया. पण ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता श्रेय का घेताय?

  • मुख्यमंत्री खरे रामभक्त असते तर आधी सुरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले होते. आताचे उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले नव्हते. पण हे जातील म्हणून तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा? म्हणत ते सुद्धा गेले. (Addiction to alcohol destroys the home, but intoxication of power destroys the country: Uddhav Thackeray)

रामराज्य महाराष्ट्रात कधी येणार? शेतकरी एवढा टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत, सरकार पंचनामे करायलाही जात नाही. मग मुख्यमंत्री जातात आणि आदेश देतात की, ताबडतोब पंचनामा करा. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात वेळेत मदत पोहोचत होती की नाही? आता शेतकरी बोलत आहेत की, पंचनामे कशाला करताय तर आमच्या मैताला या. हे निर्लज्ज आहेत, मैतालासुद्धा जातील.

  • मी घरात बसून कारभार केला. पण त्यावेळी माझे सहकारीदेखील काम करत होते. काम करायचं असेल तर कुठेही करु शकतो. नुसतं वणवण फिरला म्हणून काम झालं म्हणता येणार नाही. जनतेला मदत झाली नाही तर तुमच्या पदाचा उपयोग आहे. त्यावेळी संकट असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं.

पंतप्रधान मोदींनीसुद्धा आठ वर्षात काय केलं ते जनतेसमोर येऊन सांगत का नाही? ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव चोरलं, माझा बाप चोरलं, मग तुम्ही जनतेला कसं सांभाळणार?

चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी आव्हान देतो मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून येतो. तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव  घेऊन या. मैदानात या, एका व्यासपीठावर बोला. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, आम्ही जे बोलायचंय ते बोलू. जनता जनार्दन आहे

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. पण मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. इकडे आलेली माणसं माणसं नाहीत का? हो संभाजीनगरच्या सभेला मुसलमान आले होते. ते माणसं नाहीत? भाजपने जाहीर करावं त्यांचं हिंदुत्व काय?

 

ते शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे. आम्ही काँग्रेसबरोबर गेलो. आम्हाल कोणी घालावलं? प्राण न जाये, पण वचन न जाए, असं काही नाही. खुर्ची मिळाली भरपूर झालं.

 

एका महिलेवर तिच्या कार्यालयात घुसून महिला गुंडांकडून हल्ला केला जातो. रोशनी शिंदे तिचं नाव. ती हात जोडून मारु नका विनंती करते. ती माफी मागते. त्याचा व्हिडीओ देते. तरीही तिच्या पोटात लाथा मारल्या जातात. पोलीस तक्रार करायला तयार नाहीत. दुसऱ्या दिवशी मोर्चा होता. ती रुग्णालयात असताना तिला अटक करण्यासाठी डिस्चार्ज मिळवण्यासाठी दबाव आणतात, मग मी हा गृहमंत्री फडतूस आहे असं म्हणालो, तुम्ही काय म्हणाला असता? हा कारभार संघ, मोदींना आणि अमित शाह यांना मान्य आहे का?

 

देश कसा असला पाहिजे? मोकळा असला पाहिजे. देश म्हणजे दगड, धोंडे नाहीत. देश म्हणजे या देशाचे माणसे. क्रांतीकारकांनी आपल्यासाठी जीव दिला असेल तर निवडणुकीत कोण पर्याय असावा? क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या, त्यांनी फास घेतले, पण तुम्हाला फक्त बोटांनी निर्णय द्यायचा आहे. तेवढं तुम्ही करु शकता. हे नाहीतर कोण असा पर्याय उभा केला जातो. नाही तर कोण काय कुणीही येईल.

 

राहुल गांधी यांना अपात्र ठरवलं, केजरीवालांना आता आत टाकतील. सत्यपाल मलिक यांनी मोठा स्फोट केलाय. हिडेनबर्ग संस्था तर बाहेर ची आहे. पण सत्यपाल मलिक हे त्यांचे पक्षाचे आहेत. तुम्ही त्यांना राज्यपाल म्हणून बसवलं होतं. अशा व्यक्तीने विधान केलंय ते गंभीर आहे. ते पुलवामा च्या हल्ल्याबद्दल बोलले आहेत. या हल्ल्याचं ते राजकीय भांडवल करण्याची शक्यता आहे.

 

कारगीलच्या युद्धावर वी पी मलिक यांनी पुस्तक लिहिलं आहे त्यात म्हटलं होतं की, विजयानंतर भाजपचं नाव लिहिलं जात होतं. पण ते म्हणाले होते हे असं होऊ शकत नाही. वाजपेयी यांनी पोस्टर्स मागे घ्यायला लावलं. एवढा मोठेपणा त्यांच्यात होता. सरकार आती है जाती है लैकीन देश रहना चाहीए, असं ते म्हणाले होते. आमचं सरकार चांगलं चाललं होतं. पण तुम्ही आमचे गद्दार फोडले. त्यांना घेऊन तुम्ही राज्यकारभार करत आहात. ही सत्तेची नशा नाही तर काय आहे? यांचा गोविंदा निघाला आहे दिल्लीवरुन आणि दिसली हंडी की फोड, हा यांचा गोविंदा आहे?

 

तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो. गेल्या आठ वर्षात देशासाठी काय केलं ते सांगा. आम्ही तुम्हाला सत्ता देतो. तुमच्या गावात उज्वला योजना कितपर्यंत व्यवस्थित सुरु आहे. पीक विमा योजना व्यवस्थित चालू आहे? तुम्हाला कळतंय तुम्ही कसे फसवले जात आहात?

 

सगळं आलबेल आहे, असा भ्रम निर्माण केला जातोय. मोदींचं सरकार येण्याआधी डॉलर, गॅस सिलेंडरचा भाव काय होता? कुणाच्या लक्षात आहे? या सरकारने आनंदाचा शिधा सुरु केलाय. पण त्यातून मिळालेल्या धान्याला बुरशी लागलेली आहे. संपूर्ण देश आणि राज्य नासून टाकलं आहे. आम्ही तुमच्यासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तुमच्यात वज्रमूठ आवळायची हिंमत होते ना?

 

Local ad 1