नांदेड आणि लातूरकर कोणाच्या मांडीवर बसणार?
अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना सांधला काँग्रेस नेत्यांवर निशाना
नांदेड : राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचे (Eknath Shinde Govt) भवितव्य 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर अवलंबून आहे. हे आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर (Congress politics of Nanded and Latur) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, अशी टिका अॅड. वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Adv.Balasaheb Ambedkar) यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारवर टांगती तलवार आहे. हे 16 आमदार अपात्र झाले तर पुढे काय होऊ शकते, याबाबत अनेक नेते अंदाज वर्तवत आहेत. यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वात आधी काँग्रेसचे 22 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर अॅड. आंबेडकर यांनी खैरेंचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर टीका केली. 16 आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, अशी टिका केली आहे. (Ad. Balasaheb Ambedkar was targeted on the Congress leader)
अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या आणि देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट देखील झाली आहे. ही भेट भाजप प्रवेशासाठीच असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावर मी कुठेही जाणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. त्यातच खैरे आणि अॅड. आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Ad. Balasaheb Ambedkar was targeted on the Congress leader)