काव्या – एक जज्बा, एक जुनून’ मालिकेत सुम्बुल तौकीर खान होणार IAS अधिकारी

मुंबई : बीग बाॅगस फेम अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान ही एका IAS अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहे. काव्या – एक जज्बा, एक जुनून’ (kavya ek jazba e junoon)मालिकेत सुम्बुल तौकीर खान ही मुख्य भुमिकेत असणार आहे. (Actress Sumbul Taukeer Khan to be an IAS officer)

काव्या एक दृढनिश्चयी आणि ध्येयाने झपाटलेली स्त्री आहे, जिने IAS बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघड निर्णय घेतले आहेत. तिच्यासोबत या मालिकेत आहे, मिश्कत वर्मा (Mishkat Verma), जो आदिराज प्रधानची भूमिका साकारत आहे.

 

‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ सुरू होत आहे, 25 सप्टेंबरपासून आणि दार सोमवार ते शुक्रवार ही मालिका प्रसारित करण्यात येईल रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहाता येणार आहे!

 

सुम्बुल तौकीर खान म्हणाली, “मी काव्या या व्यक्तिरेखेकडे आकर्षित झाले, कारण ती एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिरेखा आहे. काव्याच्या जीवनाचे एकच ध्येय आहे – IAS अधिकारी बनणे. हे ध्येयच सर्व आव्हानांवर मात करण्याचे बळ देते. काव्या केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर अशा अनेक महिलांचे ती प्रतिनिधित्व करते,

मिशकत वर्मा “आदिराज ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी फारच उत्सुक आहे, कारण ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी भारतीय टेलिव्हिजनवर झळकलेल्या पुरुष व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी आहे. तो ‘आळशी पण प्रतिभावान’ आहे आणि त्याची मोहकता त्याच्या हुशारीइतकीच लक्षणीय आहे. व्यक्तिशः मला वाटते की, महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार श्रेय मिळाले पाहिजे, त्यात भेदभाव होता कामा नये. आदिराज या व्यक्तिरेखेत देखील हीच भावना आहे.”

अनुज सुलेरे म्हणाला, नारीशक्ती दुर्दम्य आहे. आपल्या मनाजोगे जीवन जगण्यासाठी किंवा लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांना पुरुषाची गरज नाही. त्यांना एक व्यक्ती म्हणून मान मिळावा हीच अपेक्षा असते. आणि मला वाटते की, पुरुष या नात्याने आपण त्यांना आणि त्यांच्या निवडीला मान देऊन त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. बाकी सर्व काही करण्यासाठी त्या समर्थ असतातच! या मालिकेत शुभम आणि काव्या यांच्या नात्यातील गुंतागुंत, त्यांच्या संमिश्र भावना, त्यांची व्यक्तिगत आणि व्यावसायिक ध्येये आणि ती साध्य करण्यासाठीचा प्रवास दाखवला आहे.

 

 

Local ad 1