नांदेड : गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत केली आहे. (Revenue Department takes strong action) या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. गोदावरी नदीकाठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू आहे. वाळू तस्करावर एमपीडीए 1981 (MPDA 1981) नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. (Action will be taken against sand smugglers under MPDA Act.)
महसूल खात्याच्या पथकाने 4 फेब्रुवारी रोजी तीन मोठे इंजिन जप्त करून संबंधितावर लिंबगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 अन्वये दाखल केला आहे. नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगावेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्याळ, लोहा तालुक्यातील बेट सांगवी, इत्यादी गावांमधील अवैध वाळू साठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे.
Related Posts
आज पर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढे सुद्धा ही अविरत कार्यवाही सुरू राहणार आहे. या कारवाईनंतर वाळू तस्करानी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर MPDA 1981 नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे.
ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (District Collector Rahul Kardile), अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ (Sub-Divisional Officer Dr. Sachin Khallal) कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार (Sub-Divisional Officer of Kandahar Aruna Sangewar) यांच्या सनियंत्रणाखाली नांदेड तहसीलदार संजय वारकड व लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल दिगलवार नायब तहसीलदार नांदेड पथक प्रमुख, नन्हणू कानगुले मंडळ अधिकारी, कुणाल जगताप मंडळाधिकारी, तलाठी रमेश गिरी, संताजी देवापुरकर, माधव भिसे, सरपे, रणवीरकर, खेडकर, जाधव, कदम, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादी करत आहेत.