किनवटमध्ये तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई
नांदेड : किनवट शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 23 जानेवारी रोजी किनवट शहरात अचानक धाडी टाकून 11 तंबाखू विक्रेत्यांकडून 7 हजार 800 रुपये दंड आकारण्यात आला. (Action against tobacco sellers in Kinwat)
Related Posts
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर (District Surgeon Dr. Nilakant Bhosikar), अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Action against tobacco sellers in Kinwat)
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मामीडवार, पो. हे. कॉ. वाडगुरे व ना.पो.कॉ. पाटोदे आदी होते. (Action against tobacco sellers in Kinwat)
सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. (Action against tobacco sellers in Kinwat)