(Parallel assembly) इंदिरा गांधीही आवाज दाबू शकल्या नाहीत : फडणवीस

आघाडी सरकारने 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला. (maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly)

 

दरम्यान, फडणवीस यांच्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार गोयल आणि हरिभाऊ बागडे यांनी या अभिरुप विधानसभेच्या चर्चेत भाग घेतला. ही चर्चा सुरू असतानाच तिकडे विधानसभेतही या अभिरुप विधानसभेचे पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी अभिरुप विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला? माईक देण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल करतानाच विरोधकांना देण्यात आलेला माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा ठासून मांडला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले.  (maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly)

अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आमदारांना माईक देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांचे आदेश आहे. त्यामुळे आम्ही माईक जप्त करण्यासाठी आलो आहोत, असं मार्शल भाजपच्या आमदारांना सांगत होते. मात्र, भाजपचे आमदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली. त्याचवेळी मार्शल माईक काढून घेत असताना मीडियाचे प्रतिनिधी पुढे आले आणि त्यांनाही धक्काबुक्की झाली. मीडियालाही दूर जाण्यास मार्शल सांगत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला. (maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly

Local ad 1