...

Accidental death of Baba Rao Ambadwar। नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन

सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील कोल्हेबोरगाव येथील रहिवासी तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार (वय 72) (Accidental death of Baba Rao Ambadwar)यांचे अपघाती निधन झाले आहे.

 

पुणे- सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या माळवत-चिखली या गावाजवळ एक जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार ट्रकला धडकली त्यात एंबडवार यांचा मृत्यू झाला. चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत.

 

 

बाबाराव एंबडवार हे पुण्याला आपल्या मुलाला भेटण्यासाठी कारने जात होते. यावेळी पुणे- सोलापूर हायवेवर माळवत-चिखली या गावाजवळ शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची कर रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात बाबाराव एंबडवार यांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

बिलोली तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटातून (Arli Zilla Parishad group in Biloli taluka) ते पाच वेळा सदस्य (Member of Zilla Parishad five times० म्हणून निवडून आले. तसेच एक वेळेस आरळी जिल्हा परिषद मधून बिनविरोध सदस्य म्हणूनही निवड्न आले. चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्तील खंबीर नेतृत्व म्हणून आजही त्यांची तालुक्यात ओळख होती.

 

 

बाबाराव एंबडवार यांच्या अपघाती निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली असून अनेक राजकीय मंडळींनी त्यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले आहे. त्यांच्या पार्थिवावर कोल्हेबोरगाव येथे आज 2 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्री, दोन मुले, दौन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

Local ad 1