...

पुण्यात मोठा अपघात : वाहतूक कोंडी अन् कंटेनरची 24 वाहनांना धडक, अनेकजण जखमी

पुणे : रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई- बंगरुळू राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Bangrulu National Highway) नवले पुलाजवळ (Accident near Navale bridge) एका कंटेनरने (container) अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात प्राथमिक माहितीनुसार 24 वाहनांना धडक दिली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Accident in Pune: Container collides with vehicles stuck in traffic jam, many injured)

 

नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून, रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात सुमारे 24 गाड्यांना उडवले आहे. यात अनेक वाहनांचा चुराडा झाला आहे. ही वाहने वाहतूक कोंडी असल्यामुळे महामार्गावर थांबलेली होती. अपघातात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने सांगण्यात येत आहे. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली. (Accident in Pune: Container collides with vehicles stuck in traffic jam, many injured)

 

दरम्यान या अपघातात जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार केले आहेत. अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागले आहेत परिणामी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. (Accident in Pune : Container collides with vehicles stuck in traffic jam, many injured)

Local ad 1