Accident at Chandni Chowk । चांदणी चौकात भिषण अपघात; तिघे जखमी 

पुणे. कल्यानीनगर भागातील हायप्रोफाईल अपघात (High profile accident in Kalyani Nagar area) व त्यानंतर बुधवारी झालेला मार्केटयार्ड भागातील भयावह अपघाताने शहर हादरलेले असताना गुरुवारी चांदणी चौकात एसटी महामंडळाच्या मालमाहतूक करणाऱ्या गाडीचा आणि सिमेंट मिक्सरक्सह विचित्र अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून हा भिषण अपघात झाल्याचे सांगितले जाते. मिक्सर आणि दोन दुचाकींना उडवले असून, यात तिघेजण गंभीररित्‍या जखमी झाले आहेत. त्‍यामध्ये एका तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्‍याची माहिती आहे. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास घडला आहे. चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येताना उतारावर झाला आहे.  अपघातात प्रफुल्‍ल नागपुरे, प्रसाद साळुंखे आणि कविता साठे हे तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पुण्यात बुधवार अपघाताचा वार ठरल्‍यानंतर सलग दुसऱ्या दिवशी झालेल्‍या अपघाताने पुणेकर चिंतेत आहेत. (Accident at Chandni Chowk; Three injured)

 

 

पोलिसांच्या माहितीनुसारएसटी महामंडळाची कार्गो बस हिंजवडीहून कोथरूडच्या दिशेने येत होती. त्यावेळेस चांदणी चौकातून खाली उतरत असताना बस सिमेंटच्या मिक्सर वाहनाला धडकली. त्यामुळे दोन्ही वाहने दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर गेली. त्यात दोन दुचाकी देखील अपघाताच्या खाईत सापडल्या. समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींना एसटीने जोरदार धडक दिली. अपघातात एक दुचाकी एसटीच्या चाकाखाली आली तर दुसरी दुचाकी दुभाजकाला जाऊन आदळली. परिणामतः या अपघातात तिघेजण गंभीरित्या जखमी झाले आहे. त्यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरी तर दुसऱ्या दोघांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्‍त महिला भुगाव येथून कोथरूडकडे निघाली होती. तर दुसऱ्या दुचाकी वरील तरुण मुळचा गोंदीया येथील रहिवासी असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

तोही कोथरूडच्या दिशेने मार्गस्थ होत होता. मात्र त्याच वेळी भरधाव एसटी कार्गो बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उतारावरून गाडी दुसऱ्याच लेनवर गेली आणि हा भिषण अपघात झाला.  अपघातामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलीस वाहतूक पोलीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्‍यांनी काही वेळातच परिसरातील वाहतूक सुरळीत केली.

 

Local ad 1