ACB Trap News | Parbhani मुलीला पहिल्या वर्गात प्रवेशा देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणारे मुख्याध्यापक, लिपिक अटक

ACB Trap News | Parbhani : परभणी जिल्ह्यात एका शाळेच्या लिपिकाने आणि मुख्याध्यापकाने मुलीला पहिल्या वर्गात प्रवेश (Admission of girl child to first class) देण्यासाठी साडेसात हजार रुपयांची लाच मागितली. तर पहिला हप्ता म्हणून साडेपाच हजार रुपये ठरले. त्यातील चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोच्या (Anti-Corruption Bureau)  पथकाने अटक केली. त्यानंतर मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. (Principal, clerk arrested for accepting bribe of Rs 4,000 to admit girl to first class)

 

 

 

मोहम्मद अब्दुल रफी मोहम्मद अब्दुल रशीद  (वय 54 वर्ष, व्यवसाय कनिष्ठ लिपिक, बाल विद्या मंदिर माध्यमिक शाळा, नानलपेठ शाखा परभणी रा.भोई गल्ली परभणी) आणि एकनाथ कच्छवे (वय 57 वर्षे, व्यवसाय मुख्याध्यापक बाल विद्या मंदिर (प्राथमिक), नानलपेठ शाखा,परभणी रा.जुना पेडगाव रोड, परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

तक्रारदार यांच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी लिपिक आणि मुख्याध्यापक यांनी 7500 रुपयांची लाच मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली. दिनांक 28/06/2023 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता यातील आरोपी 01 आणि 02 यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी तडजोडीअंती 5,500 रुपयेे पंचासमक्ष लाच मागणी केली. त्यापैकी 4,000 रुपये दिनांक 03/07/2023 रोजी लिपिकाकडे देण्यास मुख्याध्यापक यांनी सांगितले. उर्वरित 1,500 रुपये दीड ते दोन महिन्यांनंतर आणून देण्यास सांगितले.

 

 

अँटी करप्शन ब्युरो,नांदेडचे  पोलीस अधीक्षक  डॉ.राजकुमार शिंदे (ACB Superintendent of Police of Nanded Dr.Rajkumar Shinde), पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर (Deputy Superintendent Ashok Ipper), सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोहेकॉ मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, पोकॉ अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल  यांचा समावेश होता.

Local ad 1