Pune ACB News । पुणे झोपडपट्टी पुनवर्सनचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी शिरीष यादवर अपसंपदा प्रकरणी एसीबीने केला गुन्हा दाखल

ज्ञात उत्पनापेक्षा आढळली 1 कोटी38 लाख 74 हजारांची मालमत्ता

पुणे (Pune ACB News) : बेकायदेशीररित्या ज्ञात उत्पनापेक्षा 20 टक्के म्हणजे तब्बल 1 कोटी 38 लाख 74 हजारांची मालमत्ता बाळगल्या प्रकरणी पुणे झोपडपट्टी पुनवर्सन कार्यालयातील तत्कालीन उपमुख्यकार्यकारी शिरीष यादव आणि पत्नी प्रतीक्षा यादव यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिपबंधक विभागाकडून (Anti-Bribery Department) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसीबीच्या अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Dr. Sheetal Janve is an Additional Superintendent of Police) यांनी फिर्याद दिली. (ACB filed a case against Shirish Yadav along with his wife in the embezzlement case)

 

झोपडपट्टी पुनवर्सन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी पदावर असताना शिरीष यादव याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती गोळा केली आहे, अशी माहिती एसीबीला मिळाली होती. त्यानुसार यादवला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांना समाधान कारक उत्तर देता आली नाहीत. तसेच उत्पन्नाचे स्त्रोत ही स्पष्ट करता आले नाही. (ACB filed a case against Shirish Yadav along with his wife in the embezzlement case)

Ratan Tata Death । रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड म्हणाली गुडबाय माझ्या जिवलग मित्रा…

 

त्यामुळे त्यांच्यावर उत्पनाच्या 20 टक्के संपत्ती अधिक असल्याचे स्पष्ट झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे यादव दमपत्याने स्पष्टीकरनासाठी बनावट दस्त चौकशी अधिकाऱ्याला सादर केले होते. यामध्ये शासनाची फसवणूक केल्याने दांपत्यावर 420, 467, 468, 469, 475,474, 477, 120 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अनिल कटके (Deputy Superintendent Anil Katke) करत आहे.

 

Local ad 1