चार महिन्यात 400 लाचखोरांना एसीबीचा दणका, लाचखोरीची 280 प्रकरणे उघड

पुणे : शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कामात मदत करण्यासाठी लाच मागितली जाते. परंतु अवघ्या चार महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (Anti-Corruption Bureau (ACB) 400 लाचखोरांना गजाआड केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कामगिरी सरस असल्याचे अकडेवारीवरुन दिसून येत आहे. (ACB busted 400 bribe takers, 280 bribery cases exposed)

 

 

राज्यातील लाचखोरांवर कारवाईसाठी राज्यात आठ परिक्षेत्र कारवाई केली जाते. तसेच सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय असून, त्याठिकाणी उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी असतो. जानेवारी ते एप्रिल ( दि.25) 2023 पर्यंत 280 सापळे यशस्वी झाले असून, त्यात 400 लाचखोरांना अटक करण्यात आली. जानेवारीमध्ये 59 सापळ्यात 80 जणांना अटक करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात 75 सापळ्यात 111, मार्चमध्ये 88 सापळ्यात 124 तर एप्रिलमध्ये 58 ठिकाणी कारवाई करत 85 आरोपिंना अटक केल्याची नोंद आहे. (ACB busted 400 bribe takers, 280 bribery cases exposed)

 

 

ACB busted 400 bribe takers, 280 bribery cases exposed

. गेल्यावर्षी (2022) जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 220 ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्यात 300 आरोपींना अटक झाली होती. त्यामध्ये जानेवारीमध्ये 46 ठिकाणी 65 लाचखोरांचा समावेश होता. फेब्रुवारीत 50 सापळ्यात 66 आरोपी, मार्चमध्ये 85 सापळ्यात 107 तर एप्रिल महिन्यात 39 कारवाईमध्ये 62 आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु यंदा (2023) गेल्या वर्षीच्या तुलनेत 60 सापळे अधिक यशस्वी झाल्याची नोंद आहे. (ACB busted 400 bribe takers, 280 bribery cases exposed)

 

सापळे वाढीची टक्केवारी (तुलनात्मक)
जानेवारी – 28 टक्के
फेब्रुवारी – 50 टक्के
मार्च – 04 टक्के
एप्रिल – 49 टक्के

Local ad 1