गर्भपातासाठी आता तीन दिवसात मिळणार परवानगी

Abortion : वैद्यकीय गर्भधारणेसाठी अर्ज केल्यानंतर प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता राज्याच्या आरोग्य विभागाने नवीन नियमावली जारी (State health department issues new regulations) केली आहे. त्यात वैद्यकीय मंडळाकडे (Medical Board) गर्भपाताची (Abortion) विनंती आल्यास त्यांना गर्भपातास होकार किंवा नकार तीन दिवसांत द्यावे लागणार आहे. (Abortion will now be allowed in three days)

 

 

 

केंद्र शासनामार्फत गर्भधारणेच्या (Abortion) 24 आठवडे पर्यंतच्या गर्भपातास स्वेच्छेने कायदेशीर मान्यता दिलेली आहे. गर्भधारणेच्या 24 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर वैद्यकीय गर्भपात करण्यासाठी राज्य शासन किंवा केंद्र शासित प्रदेश मार्फत स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाची मान्यता आवश्यक असते.  (Abortion will now be allowed in three days)

 

 

 

एखादया महिलेला गर्भधारणेच्या 24 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर गर्भपातास (Abortion) मान्यता मिळण्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या वैद्यकीय मंडळाकडे विनंती करता येते. हे मंडळ गर्भवती महिलेची व तिच्या अहवालाची तपासणी करून गर्भपात करणे योग्य राहिल अथवा नाही याबाबत आपले मत देण्याबाबत तसेच स्थायी वैद्यकीय मंडळाची सुधारित कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.   (Abortion will now be allowed in three days)

 

 

 

वैद्यकीय मंडळाकडे विनंती प्राप्त झाल्यापासून 3 दिवसांच्या आत मान्यता अथवा नकार याबाबतचे वैद्यकीय मंडळाचे मत फॉर्म -डी मध्ये देणे, आवशक आहे. तसेच वैद्यकीय मंडळाने मान्यता दिल्यास, अशी विनंती प्राप्त झाल्या पासून 5 दिवसांच्या आतवैद्यकीय गर्भपाताची प्रक्रिया योग्य समुपदेशनासह व सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी सह मान्यता प्राप्त वैद्यकीय गर्भपात केंद्रात पार पाडावी लागणार आहे.  (Abortion will now be allowed in three days)
Local ad 1