Aadhaar Card Update । बारा अंक असलेले आधार कार्ड ही आपल्या देशातील सर्वांची ओळख आहे. आपल बँक खाते उघडायचे असेल किंवा टॅक्स फाईल करायचे असेल अथवा कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र, सुरुवातीला माहिती सांगताना आणि अनेकांच्या चुका झाल्या आहेत. तसेच नाव, पत्ता, पिन कोडमध्ये चुक झाली आहे. त्या दुरुस्त करुन घेणे आवश्यक आहे. (Aadhaar Card Update : Update Aadhaar Card Immediately)
Pune Book Festival । साहित्याची भूक भागविणारा अप्पा बळवंत चौक ही वाचणार पुस्तक
आधार कार्डमध्ये मोफत अपडेट करण्यासाठी सरकराच्या वतीने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा मार्च ते जून, नंतर हीच मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली. पुढे आणखी वेळ देत १४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, फोन नंबर किंवा नावात काहीतरी चूक झालेली असेल तर तुम्ही आधार कार्डमध्ये बदल करु शकता. यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाहीत. जर तुम्हाला बायोमेट्रिकशी संबंधित कोणती माहिती अपडेट करायची असेल तर तुम्हाला अधिकृत केंद्रावर जावे लागेल.