Strike by banks। बँकेतील व्यवहार ऑनलाईनच करावे लागतील ; बँकांचा दोन दिवसांचा देशव्यापी संप

Strike by banks । पुणे  : केंद्र सरकारच्या बँक खासगीकरणाच्या विरोधात दे्शातील सर्व सरकारी बँकांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. दिनांक 16 आणि 17 डिसेंबर या दोन दिवशी  बँका बंद असणार आहेत. (A two-day nationwide strike by banks) त्यामुळे आपल्या दोन दिवस बँकांतील सर्व व्यवहार ऑनलाईनच करावे लागणार आहेत. (Bank transactions have to be done online)

मोठी बातमी : मदतीच्या रक्कमेतून शेतकर्‍यांची कर्ज वसुली थांबवा ; बँकाना सहकार विभागाचा दणका

या संपात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अर्थात सर्व बँक कर्मचारी-अधिकार्‍यांची संयुक्त कृती समितीच्या सर्व सदस्य संघटनांनी सहभाग दर्शवला आहे. संपामुळे खातेदार्‍यांच्या होणार्‍या गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
  देशहितासाठी हा संप पुकारला गेल्याची भावना  संपकर्‍यांनी व्यक्त केली असून, खासगीकरणामुळे वाड्या-तांड्यातील आणि खेड्यापाड्यातील बँकांच्या शाखा बंद होतील (Bank branches will be closed) आणि त्यामुळे हरितक्रांती – श्वेतक्रांती (Green Revolution – White Revolution) यांना खीळ बसून शेतकर्‍याचा वाली रहाणार नाही. तो परत एकदा सावकर्‍यांच्या तावडीत भक्ष म्हणून जावून देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण होईल. तशीच अवस्था नव-उद्योजकांच्या (Entrepreneur) बाबतीत घडू शकते. अधिक नफ्यासाठी कमी मनुष्यबळात आणि कमी वेतनात काम करवून घेण्याचा पायंडा खासगीकरणामुळे घडेल. त्याबरोबरच नोकरभरती योग्य प्रमाणात होणार नाही पर्यायाने नोकरीच्या संधी नव्या पिढीसाठी राहणार नाही. शिवाय नोकरीतील आरक्षण देखील संपुष्टात येईल, अशी भिती बँक कर्मचाऱ्यांना आहे. (A two-day nationwide strike by banks)

 

काय म्हणता..? आता किराणा दुकान आणि बेकरीत ही मिळणार वाईन ?

   बँक ही सर्वसामान्यांची आर्थिक विश्वस्त भूमिकेत काम करत असल्याने सर्वसामान्यांचा पै-पै साठवलेला कष्टाचा पैसा हा मोठी कॉर्पोरेट आणि धनदांडग्यांच्या लुटीसाठी मोकळा सोडू दिला जावू शकत नाही आणि तो जावू देणार नाही, अशी संपकर्‍यांची भूमिका आहे, असे बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकारी संघटनेचे सचिव राजीव ताम्हाणे यांनी स्पष्ट केले.  (A two-day nationwide strike by banks)
Local ad 1