(District) कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांपर्यंत “या” योजनांचा मिळणार लाभ
नांदेड : जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या गरजू कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी सोमवार 28 जून पासून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पर्यंत योजना पोहचविण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
A special campaign has been launched by the district administration to provide various government schemes to the needy families of those who have died due to corona infection in the district. Representatives of the district administration will visit his house from Monday, June 28 and try to convey the plan to him. Presented by Vipin Itankar.
गतवर्षीच्या मार्च महिन्यांपासून आजच्या घडिला जवळपास 91 हजार 225 बाधित जिल्ह्यात झाले असून यातील सुमारे 88 हजार 578 बाधित उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. एकुण बाधितांपैकी सुमारे 1 हजार 904 व्यक्ती जिल्ह्यात कोरोनानी बळी पडले आहेत. अशा कुटुंबांना सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक मिशन हाती घेऊन सामाजिक न्यायाच्या शासकिय योजना त्या-त्या कुटुंबाच्या पात्रतेनुसार तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.
About 91,225 affected districts have been affected since March last year, of which about 88,578 have returned home after treatment. Out of the total victims, about 1 thousand 904 people have fallen victim to coronation in the district. In order to rehabilitate such families, the district administration has undertaken a mission to make the government scheme of social justice immediately available according to the qualifications of the families.
राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या धोरणाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी पडलेल्या व्यक्तींच्या अनाथ मुलांना तात्काळ सहाय्य पुरविले जात आहे. पालक गमविलेल्या शुन्य ते 6 वयोगटातील बालकांसाठी शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र बालगृह अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
As per the policy of Women and Child Welfare Department in the state, District Collector Dr. A task force was set up under the chairmanship of Vipin Itankar. The orphans of the Corona victims in the district are being given immediate help. There is a kindergarten for children between the ages of zero and 6 who have lost their parents and a separate kindergarten for children between the ages of 6 and 18.
या आहेत शासनाच्या योजनाराज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ अशा कुटुंबांना दिला जाईल. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत. महिला व बालविकास विभागांतर्गत बालसंगोपन योजना, शिशुगृह योजना, बालगृह योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल (केशरी) शेतकरी योजना यांचा समावेश आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थी इयत्ता 6 वी ते दहावीसाठी निवासी शाळा, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना यांचेही प्रावधान ठेवले आहे.
—