दोन हजारांची लाच स्विवकरणारा महसूल सहाय्यक दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात

लातूर : नातेवाईकाच्या जामीनासाठी आवश्यक असलेल्या ऐपतदारी प्रमाणपत्र (Eligibility Certificate) देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विवकरणारा उदगीर तहसील कार्यालयातील (Udgir Tehsil Office) महसूल सहायक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे आरोपी यापूर्वी 2016 मध्ये ही लाच स्विवकरताना अटक करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा त्याच्यावर कारवाई झाली आहे.

 

 

प्रशांत अंबादासराव चव्हाण ( वय 48 वर्ष, पद – महसूल सहायक (लिपिक), नेमणूक- तहसिल कार्यालय, उदगीर ता.उदगीर, जि.लातूर ) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (A revenue assistant who accepted a bribe of Rs 2,000 is in ACB’s net for the second time)

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे भाऊजी वर गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्ह्यात तक्रारदारांचे भाऊजीच्या जामीना करीता सॉलव्हन्सी (ऐपतदारी प्रमाणपत्र) लागणार असल्याने, त्यांच्या वडिलांच्या नावे सॉलव्हन्सी काढणे कामी आलोसे कडे तक्रारदाराने अर्ज केला असता आलोसे यांनी सॉलव्हन्सी (ऐपतदारी प्रमाणपत्र) काढून देण्याचे कामासाठी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

 

 

आरोपी लोकसेवक प्रशांत चव्हाण यांचे वर 2016 साली लाप्रवि लातूर कार्यालयाकडून लाच स्विकृती यशस्वी सापळा कारवाई झालेली असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आरोपीवर आज दुसऱ्यांदा यशस्वी सापळा कारवाई झालेली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (A revenue assistant who accepted a bribe of Rs 2,000 is in ACB’s net for the second time)

 

 

 

➡ मार्गदर्शक
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
धरमसिंग चव्हाण,अपर पोलीस अधिक्षक,
ला. प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड.

➡ पर्यवेक्षण अधिकारी
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
ला. प्र. वि. लातूर.

➡ सापळा पथक
अन्वर मुजावर व भास्कर पुल्ली, पोलीस
निरीक्षक ला. प्र. वि. लातूर आणि ला.प्र.वि. लातूर
टीम

➡ तपास अधिकारी
अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक,
ला. प्र. वि.लातूर

 

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. (A revenue assistant who accepted a bribe of Rs 2,000 is in ACB’s net for the second time)

 

डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर – 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी – 02382-242674
@टोल फ्रि क्रं. 1064

Local ad 1