नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी होणार विक्रमी लसीकरण

नांदेड Nanded news : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. दररोज सुमारे 100 लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होत असते, परंतु शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचे (Marathwada Liberation Day) औचित्य साधून तब्बल 75 हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे, (A record vaccination will be held in Nanded district on Friday) अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. (Collector Dr. Vipin Itankar) 

 

 
नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी झाले असले तरी, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असे म्हणता येणार नाही.  त्यामुळे नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडून ज्या प्रमाणे लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे केंद्रांना वितरित केले जात आहे.  (A record vaccination will be held in Nanded district on Friday)

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार,  मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी एका दिवसात 75000 नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे नियोजन नांदेड जिल्हा प्रशासनाने (Nanded District Administration) केले आहे. नागरीकांनी या लसीकरण मोहिमेत सकारात्मक प्रतिसाद देवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.  (A record vaccination will be held in Nanded district on Friday)

दरम्यान,  जिल्ह्यात 12 सप्टेंबर पर्यंत एकुण 11 लाख 64 हजार 354 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 13 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 90 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 92 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत.  (A record vaccination will be held in Nanded district on Friday)
Local ad 1